साईमत जळगाव प्रतिनिधी
नाशिक येथील पब्लिक स्कूल मध्ये शिक्षण घेतलेले गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील यांचे वर्गमित्र तब्बल ४८ वर्षांनंतर एकत्र आले. त्या प्रसंगी सर्वांच्या चेहर्यावर कमालीचा आनंद होता.
कोल्हापूर येथे ३ ते ५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील शासकीय पाच विद्या निकेतन मध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थी सहभागी असणार आहे. या सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी नाशिक सह कोल्हापूर येथील मित्र परिवार उपस्थित होता. या सोहळ्यासाठी जळगाव तर्फे संपूर्ण सहकार्य करू असे आश्वासन डॉ उल्हास पाटील यांनी दिले.
यावेळी शामराव वामनराव घोरपडे (पुसेगांव), राजेंद्र नायकू माळी (मुंबई), अतुल शांतीनाथ मंडपे (कोल्हपूर), निळकंठ रामदास पाटील, प्रकाश भागीनाथ बच्छाव (नाशिक-धुळे), गजानन गोणी (पुसेगांव), जयवंत देशमुख (नाशिक), प्रितम फणसवाडीकर (पुसेगांव), राजेंद्र शांतीनाथ मुधाळे (बहिरशेट) (पुसेगांव), दशरथ भाऊसो गोडसे (सातारा), अनंत कुलकर्णी (नाशिक), बंडोपंत आनंदराव पाटील (सातारा), बाळसाहेब दगडू हारके (सातारा), डॉ.विकास आडमुठे (सातारा), विवेकांनद सदाशिव पाटील (सातारा), प्रमोद नारायण बावयकर (सांगली), गिरीश आरेकर (पुसेगांव), छगन दादा नेरकर (नाशिक), सुनिल सोनवणे, आजिनाथ सुखदेव वेलेकर (बॅच सांगलीनगर), डॉ.सलीम बशीर तडवी (धुळे), नवाब हबीबी तडवी (धुळे), सायबु जुम्मा तडवी (पुसेगाव), अभिजीत रमेश पाटील (बोरसे-धुळे), सिद्धार्थ नेतकर (जळगाव), डॉ.अशोक चौधरी, डॉ.सुभाष बडगुजर आदि उपस्थीत होते.