मालदाभाडी हायस्कूल येथील ‘ग्रीन आर्मी’चा स्तुत्य उपक्रम
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
‘झाडे’ ही मानवाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत सच्च्या मित्राप्रमाणे साथ देतात. या भावनेने प्रेरित होऊन मैत्री दिवसाचे औचित्य साधून मालदाभाडी येथील न्यू इंग्लिश स्कुल शाळेत ‘ग्रीन आर्मी’च्या स्वयंसेवकांनी वृक्षांना ४०० पेक्षा जास्त फ्रेंडशिप बँड बांधले. अध्यक्षस्थानी करूणा महाजन होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अरुण पाटील, नितीन पाटील उपस्थित होते.
परिसरात काळसड, हिवर, भोकर, टेंभुर्णी यासारख्या दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प ‘ग्रीन आर्मी’ने केला आहे, अशी माहिती ‘ग्रीन आर्मी’चे प्रमुख विजय सैतवाल यांनी दिली.
यशस्वीतेसाठी जी.टी.पाटील, आर. एल. कोळी, एन. एस. पाटील, मनोज जैन, ग्रीन आर्मीचे स्वयंसेवक दिव्या मंगळकर, कोमल बाविस्कर, रोशनी काळे सागर पालोदे, संदेश खुरपडे, कार्तिक बडगुजर, लिना बडगुजर, वैष्णवी चिमकर यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल शाळेचे प्र.मुख्याध्यापक एस.आर. शेकोकार, पंचक्रोशीतील मान्यवरांनी कौतुक केले. प्रास्ताविक प्रतिक्षा खराटे, सुत्रसंचलन जागृती बोरसे तर आभार कुणाल कोळी यांनी मानले.