Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»दोंडाईचात १३ हजार घरांना मोफत नळ कनेक्शन
    धुळे

    दोंडाईचात १३ हजार घरांना मोफत नळ कनेक्शन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 8, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, दोंडाईचा । प्रतिनिधी

    शहरातील सर्वच परिसरात नळांना सारख्याच दाबाचा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नवीन फिल्टर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. आता त्याद्वारे १३ हजार घरांना मोफत अत्याधुनिक नळ कनेक्शन मिळणार आहे. त्याची सुरवात माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते झाली. यावेळी दोंडाईचा-वरवाडे नगर पालिकेचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, माजी आरोग्य सभापती कल्पना नगराळे, भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन, माजी उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, रवी उपाध्ये, नगरसेवक विजय मराठे, रवींद्र उपाध्ये, खलील बागवान, कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, निखिल जाधव, छोटू मराठे, जितू गिरासे, नरेंद्र गिरासे, नरेंद्र कोळी, भरत ठाकूर, चिरंजीवी चौधरी, ईश्वर धनगर, कांतिलाल मोहिते, रघुनाथ बैसाणे, देवा पाटील, राजू धनगर, संदीप धनगर, इस्माईल पिंजारी, पंकज चौधरी, हरेश आव्हाड,भिकन बागवान, पालिकेचे बांधकाम इंजि. जगदीश पाटील, शिवनंदन राजपूत, प्रवीण आगळे, धनराज करनकाळ, भय्या रामराजे, रवींद्र अहिरे, सचिन नगराळे, अजय बिरारे, सागर नगराळे, मुकेश नगराळे, अक्षय चव्हाण, मनोहर कापुरे, प्रफुल्ल नगराळे, आकाश इंदवे, रोहित नगराळे आदी उपस्थित होते.

    कार्यक्रमप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती विकास निधीतून ८० लाख रुपये खर्चून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शनिमंदिरपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व आरसीसी गटार बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन, रमाई आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून ७१ लाभार्थ्यांना लाभाचे वाटप, दलीत वस्ती विकास निधीतून विविध गल्ल्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे लोकार्पण, पंतप्रधान आवास योजनेतून जवळपास ३५ लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये खात्यात जमा होणार असल्याचे पत्रवाटप केले. प्रास्ताविक कृष्णा नगराळे तर सूत्रसंचालन रवींद्र अहिरे यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dhule : धुळ्यातील पिंपळनेर हादरले; आनंदोत्सवात धारदार शस्त्रांचा कहर

    February 20, 2026

    Taloda:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तळोदा महाविद्यालयात अभिवादन

    January 3, 2026

    Navapur:“नवापूर नगराध्यक्षांचे दालन नागरिकांसाठी सदैव खुले; नवापूरमध्ये लोकशाही संवादाला नवे बळ”

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.