अंबीलहोळ देवीचेला गुरुवारी मोफत आरोग्य निदान शिबीर

0
36

चैतन्य धाम गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टतर्फे स्तुत्य उपक्रम

साईमत/न्यूज नेटवर्क/जामनेर :

तालुक्यातील अंबीलहोळ देवीचे येथे जीएम फाउंडेशन आणि जामनेरच्या न्यू रुबी स्टार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने श्याम चैतन्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य निदान शिबिर गुरुवारी, १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता श्री रामदेवजी बाबा मंदिर येथे आयोजित केले आहे. शिबिराचे आयोजन चैतन्य धाम गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टने केले आहे. शिबिराचे उद्घाटन जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते होईल.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड उपस्थित होते. शिबिरात डॉ. नितीन गायकवाड, डॉ. सुरुची डहाके, डॉ. शिवानी पाटील, डॉ. उत्कर्षा सोनवणे, डॉ. संजना मुणोत, डॉ. राजेश्वरी ठाकूर हे तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करतील. यासाठी जीएम फाउंडेशन व न्यू रुबी स्टार हॉस्पिटल, ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here