सर्पदंश झालेल्या विद्यार्थ्यास माजी आ. दिलीप वाघ यांनी केली आर्थिक मदत

0
46

सहा दिवसांपासून ‘धनंजय’ची रुग्णालयात सुरु होती मृत्यूशी झुंज

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या धनजंय बडगुजर या विद्यार्थ्याला सर्पदंश झाला होता. गेल्या सहा दिवसांपासून धनंजय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. त्याची आई मजुरी करुन कुटुंब सांभाळते तर वडील अपंग आहे. घटनेची माहिती माजी.आमदार दिलीप वाघ यांना समजल्यावर त्यांनी धनंजयच्या घरी भेट देवून त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याला पुढील उपचारार्थ आर्थिक मदत केली.

याप्रसंगी सर्पमित्र, सामाजिक कार्यकर्ते दिनेश गायकवाड, विजु पाटील, मौजुलाल जैन, गोविंदराव पाटील, तुषार काळे, सुरेश बडगुजर, आबा बडगुजर, रमेश पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here