“माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन राज्यस्तरीय पुरस्काराने डॉ. शरीफ बागवान सन्मानित

0
9

साईमत जळगाव प्रतिनिधी

येथील आदिलशाह फारुकी संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या “माजी राष्ट्रपती डॉ जाकीर हुसैन राज्यस्तरीय पुरस्काराने येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. शरीफ बागवान यांना गौरविण्यात आले. डॉ. शरीफ बागवान यांनी पत्रकारितेत व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा येथील माजी आमदार कैलास गोरख पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सावदा येथील डायमंड इंग्लिश मिडीयमचे अध्यक्ष डॉ. हाजी हारून शेख, उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख, माजी सरपंच नेमिचंद सोनार, जिल्हा अप्पर कोषागार शकील देशपांडे, तहसीलदार पंकज लोखंडे , नायब तहसिलदार देवेंद्र चंदनकर, डॉ. राहुल मयूर ,कबचौ उमवी सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, मजीद जकरिया , फारूक शेख ,अडावद लोकनियुक्त सरपंच बबन खा लालखा तडवी, शबनम समीर दफेदार पुणे, विकास झेंडे पुणे , नाना डोंगरे अहमदनगर, अजमल शाह, अनिता चौधरी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारूक पटेल यांनी तर प्रथम सूत्रसंचालन शबनम दफेदार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित संस्था अध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी केले, तर डॉ जावेद शेख यांनी मानले. डॉ. शरीफ बागवान यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या मित्रपरिवारातर्फे व संपूर्ण जिल्ह्यात अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here