Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»निवडणूक प्रचारावेळी जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करून हत्या
    क्राईम

    निवडणूक प्रचारावेळी जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करून हत्या

    SaimatBy SaimatJuly 8, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जपानचे  ( Shinzo Abe ) यांच्यावर शुक्रवारी सकाळी जपानच्या(Japan) नारा शहरात हल्ला झाला. निवडणूक प्रचाराच्या भाषणावेळी त्यांच्यावर अज्ञातांनी दोनदा गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आबे यांच्यावर गोळीबार झाडणाऱ्या व्यक्तीला घटनास्थळावरून अटक केली आहे. ४२ वर्षीय हल्लेखोराकडून बंदूक जप्त केली. पोलीस आरोपीची चौकशी करत असून त्याने गोळी का मारली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Former Japanese Prime Minister Shinzo Abe )

    एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शिंजो आबे वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीचा प्रचार करत होते. जपानमध्ये रविवारी (१० जुलै) वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिंजो आबे तेथे प्रचारासाठी गेले होते. सभेला संबोधित करताना आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यादरम्यान गोळीबाराचा आवाज आला आणि आबे अचानक खाली कोसळले. त्याच्या छातीत कोणीतरी गोळी मारल्याचे प्राथमिक अहवालात दिसून आले आहे. मात्र, त्यांच्यावर मागून दोन वेळा गोळ्या झाडण्यात आल्याचे नंतर स्पष्ट झाले. अशा स्थितीत घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. भाषण देताना अचानक गोळी लागल्याने आबे कोसळले. त्याचवेळी त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026

    Nashirabad:नशिराबाद पेठ परिसरात दुचाकी जाळणाऱ्या टोळीवर पोलिसांचा ठोस कारवाईचा हात

    March 14, 2026

    Pachora : अश्लील व्हिडिओचा राग तरुणाची निर्घृण हत्या, पती-पत्नी अटकेत

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.