साईमत जळगाव प्रतिनिधी
कांदा शेतीवर अभ्यासासाठी आलेले जपान येथील यासुमा कंपनी लि.जपानचे संचालक -कियोशी काटो,महाव्यवस्थापक-तकाशी इशिकावा,सहायक व्यवस्थापक-युमी वातानाबे,सहायक गटनेता-हिरोयुकी होरीकावा,डीकेएसएच कंपनी जापान चे व्यवस्थापक शिरीची इचिमुरा यांनी भोकर येथील सचिन पवार यांंच्या शेतात जाऊन कांदा पिकाची पाहणी केली व सदर पिकाची लागवडीची,निगराणीची तसेच काढणीची माहिती जाणून घेतली.
त्यानंतर पवार यांच्या राहत्या घरी जाऊन विविध तंत्रज्ञानावर सविस्तर चर्चा करून माहिती आदान- प्रदान केली.पवार यांनी भारतीय महाराष्ट्रिय संस्कृती जपत सर्व विदेशी मान्यवर तसेच ज्यांच्या मेहनतीने सदर योग घडून आला असे जैन समूहाचे अधिकारी वर्ग यांचा रुमाल,टोपी,नारळ व पुष्प देऊन सत्कार केला.
पवार यांनी कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून केलेल्या सत्काराने विदेशी पाहुण्यांनी भारावून जाऊन आम्ही परत आपल्या भेटीसाठी येऊ, असे म्हणत निरोप घेतला. या कार्यक्रमास जैन फार्म फ्रेश मार्केटिंग विभागातील प्रमुख रोशन शहा, करार शेती विभागातील प्रमुख गौतम देसार्डा, श्रीराम पाटील व भा.ज.पा.्ज्येेष्ठ नेते प्रभाकर पवार, सर्व परिवार व सहकारी उपस्थित होते. गावात विदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे भोकर व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.