साईमत जळगाव प्रतिनीधी
जिल्हयातील व्हाईस ऑफ मिडिया द्वारे पत्रकारांसाठी लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प आयोजित करण्याबाबत निवेदन जिल्हा परिवहन अधिकारी श्याम लोही यांना व्हॉइस ऑफ मीडिया मुस्लिम विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरीफ बागवान यांनी निवेदन दिले.
पत्रकार हा शासनाचा चौथा स्तंभ आहे व वृत संकलनासाठी टू व्हीलर, फोर व्हीलर घेऊन फिरावे लागते त्यामुळे लायसन्स जवळ असणे हे कायदेशीर बंधनकारक आहे. त्यासाठी जळगाव जिल्हयातील संघटनेशी जुळलेले सर्व पत्रकारांचे टू व्हीलर फोर व्हीलर लर्निंग लायसन्स नियमानुसार शासकीय फी भरून कॅम्प घेण्यात येत आहे. त्यासाठी आरटीओ विभागाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे. ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स जागेवरती देण्यात येणार असुन जिल्ह्यातील गरजू ज्यांच्याकडे लायसन्स नाही अश्या पत्रकारांनी सघटनेच्या पदधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, लायसन्स साठी नाव नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहिती साठी ९२०९२५५७८६ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्या चे वाईस ऑफ मीडियाच्या तालुका अध्यक्षा शी संपर्क करावा असे वाईस ऑफ मीडिया मुस्लीम विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरीफ बागवान यांनी पत्रकाद्वारे कळवीले आहे.