Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Maharashtra Monsoon : मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर; महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता
    जळगाव

    Maharashtra Monsoon : मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर; महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

    saimatBy saimatApril 13, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / जळगांव

    भारतीय हवामान विभागाने (IMD) आज नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून, यावर्षी देशात सरासरीच्या सुमारे 92 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा अंदाज सरासरीपेक्षा कमी पावसाच्या श्रेणीत मोडतो.

    हवामान विभागानुसार 90 ते 95 टक्के पाऊस झाल्यास तो सामान्यपेक्षा कमी पाऊस मानला जातो. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

    महाराष्ट्रातही कमी पावसाचा अंदाज : राज्यातही यावर्षी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या सर्व भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात 90 ते 95 टक्के पर्जन्य होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

    जून ते सप्टेंबरदरम्यान स्थिती मिश्र राहणार : IMD महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या माहितीनुसार, जून ते ऑगस्टदरम्यान पावसाची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता आहे. मात्र जुलै ते सप्टेंबर या काळात एल निनो परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.

    तथापि, भारतीय महासागरातील सकारात्मक परिस्थितीमुळे एल निनोचा परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    पावसाच्या श्रेणींचे स्पष्टीकरण
    हवामान विभागाच्या वर्गीकरणानुसार,
    90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस अपुरा,
    90 ते 95 टक्के कमी पाऊस,
    96 ते 104 टक्के सामान्य पाऊस,
    105 ते 110 टक्के अधिक पाऊस,
    आणि 110 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस अतिवृष्टी मानला जातो.
    या अंदाजामुळे आगामी खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात बाजार बंदीचे आदेश

    April 13, 2026

    Paladhi : पाळधी स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांसाठी प्रतापराव पाटील ठरले ‘देवदूत‘

    April 13, 2026

    Jalgaon : मनपा ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; २८ कोटी थकबाकीसाठी मोबाईल टॉवर जप्तीचा निर्णय

    April 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.