साईमत, प्रतिनिधी, जळगाव
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघनगर येथील सातवेीच्या विद्यार्थ्यांनी जैन व्हॅली येथील शेती प्रकल्पास प्रत्यक्ष भेट दिली.
या भेटीचा उद्देश व्यावहारिक उद्योजकीय कौशल्यांवर अनुभवात्मक आणि संदर्भीत समज विद्यार्थ्यांना प्रदान करणे हा होता. याशिवाय या प्रकल्पाचे उद्दिष्ट शेती उद्योजक उपक्रमाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी हा होता.
प्रकल्प भेटीमध्ये जाण्यापूर्वी, विद्यार्थ्यांचे जी.आर. पाटील यांनी स्वागत केले. शेती व त्यावर आधारित उद्योगाची संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगितली. जैन व्हॅलीचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या जीवनाचा लेखाजोखा तसेच त्यांचा शेती करण्यापासून ते शेती मालावर प्रक्रिया उद्योग चालू करण्यापर्यंतचा प्रवास सांगितला. पारंपरिक शेती व आधुनिक शेती यावर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून सक्रीय सहभाग घेतला. सदर भेटीसाठी मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयिका वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या प्रकल्प भेटीकरिता प्रकल्प प्रमुख भारती पाटील यांनी याचे नियोजन केले होते. वर्गशिक्षक सचिन गायकवाड सर,सौ. हर्षाली सोनार यांचे सहकार्य लाभले.