जिल्हा बाल संरक्षण समितीच्या सदस्यपदी फिरोज शेख

0
2

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्हा बाल संरक्षण समिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये नुकतीच गठीत करण्यात आली. निवड समितीत मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष फिरोज रफिक शेख यांचा सदस्यपदी समावेश आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ४४ व ४५ तसेच नियम २०१८ मधील २५ नुसार प्रतिपालकत्व, २६ नुसार प्रायोजकत्व व अनुरक्षण योजनेबाबत तरतूद केली आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर प्रतिपालकत्व, प्रायोजकत्व तसेच अनुरक्षणगृह संस्थेतर सेवांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पुणे आयुक्त यांच्या निर्देशानुसार नुकतीच समिती गठीत करण्यात आली. समितीत अध्यक्ष, सचिव आणि ५ सदस्यांचा समावेश आहे.

समितीत सदस्यपदी निवड झालेले फिरोज शेख यांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनच्या माध्यमातून बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांना जिल्हा बाल संरक्षण समितीचे तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्रही प्राप्त झाले आहे. निवडीबद्दल फिरोज शेख यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here