Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाची कास धरावी -जिल्हाधिकारी अमन मित्तल जळगावात कृषीदिन उत्साहात साजरा
    कृषी

    शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाची कास धरावी -जिल्हाधिकारी अमन मित्तल जळगावात कृषीदिन उत्साहात साजरा

    SaimatBy SaimatJuly 1, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाची कास धरावी -जिल्हाधिकारी अमन मित्तल जळगावात कृषीदिन उत्साहात साजरा-saimat
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरत शेतीकडे उद्योग म्हणून बघणे गरजेचे आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या काळात जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे. असा विश्वास जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केला.

    कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. मित्तल अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी श्री. जगताप यांच्यासह इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शासनाच्या सर्वाधिक योजना या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन नेहमीच शेतकऱ्यांसोबत राहील. शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाची कास धरत उत्पादन वाढ, आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण या बाबीवर विशेष जोर दिला पाहिजे. शेती क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक अमुलाग्र बदल घडत आहेत. हे बदल आत्मसात करून शेती अधिकाधिक विकसित करण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि शेतकरी यांनी हातात हात घेऊन काम करणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवता येतील त्यासाठी शासनाच्या विविध योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. गट शेती ही शेतकऱ्यांच्या फायद्याची असून कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता शेतकऱ्यांनी चौकटीच्या बाहेर विचार केला पाहिजे.

    शेतकरी आपल्या शेतात पिकवत असलेला माल प्रक्रिया करून बाजारात पोहोचल्यास शेतकऱ्यांना नक्कीच आर्थिक हातभार लागू शकतो. यासाठी लवकरच प्रक्रिया उद्योजक आणि शेतकरी यांची चर्चा घडवून आणण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन केले जाईल, असा विश्वास देखील जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी यावेळी व्यक्त केला. हवामानातील बदल, शेती क्षेत्राशी बदलत्या विविध बाबी शेतकऱ्यांपर्यंत वेळीच पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर घरी बसल्या ही माहिती मिळावी यासाठी मोबाईल वरच सर्व डेटा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे. यासाठी विविध कंपन्याशी चर्चा देखील सुरू असून लवकरात लवकर हा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावेळी सांगितले.

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आपल्या मनोगत म्हणाले की, शहरीकरण कितीही मोठ्या प्रमाणावर झपाट्याने झाले तरी देखील आजही देशाचे अर्थकारण शेतीवरच अवलंबून आहे. हवामानातील बदलामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. निव्वळ शेतीवरच शेतकऱ्यांनी अवलंबून न राहता प्रक्रिया उद्योगावर भर देणे गरजेचे आहे. जळगाव जिल्ह्यात कापूस आणि केळी या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे.

    या दोन्ही उत्पादनांना प्रक्रिया उद्योगात फार मोठी संधी आहे. जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बचत गटांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर आणि त्याचे दुष्परिणाम ओळखून रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे. जळगाव जिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. मात्र त्याचे दुष्परिणाम देखील फार मोठे आहेत. शेतकरी आणि प्रशासनाने ठरविले तर मदत होऊ शकते असा विश्वास देखील डॉ आशिया यांनी यावेळी व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora:पाचोरा बायपासवर भरधाव ट्रक पलटला

    March 19, 2026

    Jalgaon:जळगाव भगवेमय हिंदू नववर्ष स्वागत यात्रा भक्तिपूर्ण रंगात रंगली

    March 19, 2026

    Jalgaon Murder : जळगावात कौटुंबिक वादाचा अंतःस्थळ: पत्नीची लोखंडी विळ्याने निर्घृण हत्या

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.