साईमत, यावल : प्रतिनिधी
जळगाव येथे गुरुवारी, ३० नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित जन आक्रोश मोर्चात यावल तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मोर्चाचे नियोजन रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा यावल नगरपरिषद माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ३० नोव्हेंबर रोजी जळगाव येथे भव्य स्वरूपाचा शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात केले आहे. जन आक्रोश मोर्चासाठी यावल तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहे. यावल तालुक्यातील २० ट्रॅक्टर व असंख्य शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहे.
बैठकीला रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. मनोहर पाटील, चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती डी.पी.साळुंखे, यावल तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, एम. बी.तडवी, युवक तालुकाध्यक्ष पवन पाटील, सईद भाई, अयुबखान, सारंग अडकमोल, हाजी अकबर खाटीक, ललित पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील, प्रसन्ना पाटील, अरुण लोखंडे, वसंत पाटील, विनोद पाटील, युवक शहराध्यक्ष हितेश गजरे, मयूर पाटील, शहर कार्याध्यक्ष मोहसिन खान, यशवंत जासूद, निलेश बेलदार, हाजी फारुक शेख, सलीम तडवी, ताहेर खान, ललित पाटील खेडी, युवक तालुका उपाध्यक्ष रोहन पाटील, यशवंत पाटील, अमोल दुसाने, पितांबर महाजन, तुषार घारू, एजाज मण्यार, तुषार येवले, सचिन येवले, जाहिद कुरेशी, आबीद कच्ची, विजय साळी, सय्यद सुभान बिलाल, अमीर खान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.