Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»फार्मर ते फॉर्च्युनर‌’ प्रेरणादायी प्रवास..! शेतकऱ्यांनी उलगडला कृषी विकासाचा पट
    कृषी

    फार्मर ते फॉर्च्युनर‌’ प्रेरणादायी प्रवास..! शेतकऱ्यांनी उलगडला कृषी विकासाचा पट

    SaimatBy SaimatJune 8, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    इंजिनिअरींग झाल्यानंतर वडिलांनी दोन पर्याय समोर ठेवले. काळ्या आईची सेवा की नोकरी? यात शेतीला पुढील काळात भवितव्य आहे यामुळेच इंजिनिअतरिंग पेक्षा शेती करण्याचा पर्याय निवडला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, फर्टिगेशन, ऑटोमेशन, टिश्यूकल्चर या विकसीत तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यातूनच ५० एकरपासून ११० एकर शेती वाढवली. आज मध्यप्रदेशातील सर्वात समृद्ध गाव म्हणून दापोरा (जि. बुऱ्हाणपूर) आहे. फार्मर ते फॉर्च्युनर ही समृद्धी केवळ आधुनिक शेतीमुळेच साधता आली. असे अत्यंत प्रेरणादायी बोल योगेश्वर पाटील यांचे आहेत. भवरलालजी जैन यांच्या चरित्रातून आपल्याला शेती करण्याची प्रेरणा मिळाली, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

    जैन हिल्सच्या आकाश मैदानावर झालेल्या या सुसंवाद कार्यक्रमात स्वप्नील प्रकाश महाजन, (वाघोदा ता. रावेर), प्रवीण पाटील (महेलखेडी, ता. मुक्ताईनगर), गणेश तराळ, (अंतुर्ली ता. मुक्ताईनगर), अतुल उल्हास चौधरी (सांगवी, ता. यावल), प्रमोद बोरोले (साक्री फेकरी ता. भुसावळ) या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी शेतकऱ्यांनी आपआपले अनुभव कथन केले. यात ‌‘फार्मसीचे शिक्षण होऊन औषधालय सुरू केले. यातून जनसंपर्क वाढला. आपल्या शिक्षणाचा, जनसंपर्काचा विधायक कार्यासाठी उपयोग व्हावा, याच उद्देशाने स्वत: बरोबर इतरही पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारा प्रवास शिरपूर तालुक्यातील प्रगतिशील युवाशेतकरी पद्माकर पाटील यांनी फालीच्या विद्यार्थ्यांसमोर आपला कृषिविकासाचा पट मांडला.
    फाली विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर स्वरूपात आपल्या कृषिज्ञानात भर पडेल अशा बाबी जाणून घेतल्या. यावेळी प्रायोजकत्व स्वीकारलेल्या कंपनी प्रतिनिधींदेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. फालीच्या तिसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवशी जैन इरिगेशनच्या शेती संशोधन केंद्रावरील प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी बघितले. यात फ्युचर फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक, जैन स्विट ऑरेंज, अति सघन पद्धतीने लागवड केलला आंबा, पेरू व अन्य फळबागांना भेट दिली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी शेतावर जाऊन माहिती घेतली.

    आज कृषी बिझनेस मॉडेल व इन्होव्हेशनचे प्रदर्शन गत १ जूनपासून तीन टप्प्यात पार पडत असलेल्या फालीच्या नवव्या संमेलनास महाराष्ट्र, गुजरातमधील ग्रामीण क्षेत्रातील १०८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील उद्या दि. ८ जून ला तिसऱ्या टप्प्याचा समारोप होईल. यामध्ये ३१ बिझनेस व इन्होव्हेशन विद्यार्थी सादर करणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bodwad : आई-वडिलांचा छळ केलात तर दिलेली संपत्ती परत द्यावी लागेल

    January 11, 2026

    Jalgaon : आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा मुख्य आरोपी जेरबंद

    January 11, 2026

    Jalgaon : “हळदी-कुंकूसोबत मतदानाचे प्रात्यक्षिक; महिलांचा सहभाग जोरात”

    January 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.