साईमत, असलोद, ता. शहादा : वार्ताहर
शहादा तालुक्यातील शोभानगर येथे कृषी विभाग व आत्मा योजनेअंतर्गत ‘किसान गप्पा गोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी सरपंच डेमच्या वसावे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी काशीराम वसावे तसेच कृषी महाविद्यालयाचे प्रा.कुणाल पाटील, बायर क्रॉप सायन्सचे जिल्हा व्यवस्थापक समाधान म्हस्के, मंडळ कृषी अधिकारी एकनाथ सावळे, पीएमएफएमई योजनेचे डी.आर.पी. मनोज शुक्ला, मा.पं.स. कैलास वसावे, प्रगतशील शेतकरी उल्या वसावे, केशव वसावे, कृषी पर्यवेक्षका भिकुबाई पावरा, कृषी सहाय्यक कल्याण पवार आदी उपस्थित होते.
प्रा.कुणाल पाटील यांनी कापूस पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, गुलाबी बोंडअळी निरीक्षणासाठी कामगंध सापळे लावावे, याबाबत सविस्तर माहिती दिली. बायर क्रॉप सायन्सचे जिल्हा व्यवस्थापक समाधान म्हस्के यांनी कापूस पिकावरील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनबाबत सविस्तर माहिती दिली. पीएमएफएमई योजनेचे डीआरपी मनोज शुक्ला यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी काशिराम वसावे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, महाडीबीटी पोर्टलवर योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रवींद्र बच्छाव तर श्री.चौधरी वसावे यांनी आभार मानले.