साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा व शेतकरी सहल शनिवारी तिडका शिवारात धडकली होती यावेळी खरपुडी केवीके जालना येथील शास्त्रज्ञ अधिकारी यांचाही शेतकरी अभ्यास दौरा व सहलमध्ये समावेश होता या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तिडका येथील ईश्वर सपकाळ यांच्या शेताला भेट दिली.
ईश्वर सपकाळ यांच्या शेतातील सुंदर पीक रचना. मका, बाजरी, सूर्यफूल, हळद, कांदा सर्वच उत्कृष्ट. कुटुंबातील एकोपा आणि शेतीवरील निष्ठा,पाहून शेतकरी भारावून गेले होते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि चिकित्सक वृत्ती यामुळेच आपण इतरांपेक्षा वेगळे आहात. कुटुंबातील एकोपा आणि शेतीवरील निष्ठा कौतुकास पात्र आहे.भेटीत आपण दिलेला वेळ, माहिती, प्रेम आणि पाहुणचार याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले…दरम्यान अभ्यास दौऱ्यात शेतकऱ्यांनी विविध पिकांची माहिती घेतली यावेळी अरुणराव भिसे,सौ. लीलावती भिसे, श्री. श्रीकृष्ण सोनुने, सौ. अनुसया सोनुने,सौ. शशिकला वासरे,गणेश जाधव,आर.आर. काळे,जगदीश जाधव,सूर्यभान पवार,बाळभाऊ गाढे, मंगेश उजेड,गजानन उजेड,भगवान जनार्धन उजेड, माधव जनार्धन उजेड, दत्तात्रय भोसले,राहुल चौधरी,एस. ए. पठाण आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती…