साईमत/ न्यूज नेटवर्क/ फैजपूर
शासनातर्फे रॅपीड फ़ायर फ़ायटिंग अँड एमर्जन्सी बाईक व प्रोविझमिटी सुटचा पुरवठा दिनांक 25 रोजी दुपारी १ वा. जिल्हा नियोजन भवन समोर, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव मान्यवरांच्या उपस्थित देण्यात आली. सदर रॅपिड फायटिंग बाईक चा उपयोग शहरात आग लागल्यानंतर गल्लीबोळा मध्ये चार चाकी वाहन जात नसल्यास या बाईकमध्ये सर्व आग विझवण्याचे साहित्य आहे.
ती पालिकेला सुपूर्त करण्यात आली, पालिकेचे कर्मचारी आग विझवण्यासाठी या बाईकचा उपयोग करणार आहे. ज्या ठिकाणी चार चाकी जात असेल त्या ठिकाणी या गाडीचा उपयोग लवकर चार चाकी पोहोचत नसल्यास या बाईक्स सगळ्यात लवकर पोहोचून आज आग विझवण्यासाठी सोयीची असल्यामुळे शासनाकडून सदरची बाईक देण्यात आलेली आहे.