साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथे रोटरी क्लब ऑफ चाळीसगावतर्फे गरजू १९८ रुग्णांची तपासणी करून १०२ रुग्णांची प्लास्टिक, हँड आणि कॉस्मेटिक शस्त्रक्रिया (सर्जरी) करण्यात आली. शिबिरासाठी मुंबईतील शेठ रायचंद हंसराज धरमशी परिवार यांनी सढळ हाताने दातृत्वाची भूमिका केल्याने गरजूंना शस्त्रक्रियेचा लाभ घेता आला. गेल्या २१ वर्षापासून गरजू रुग्णांसाठी रोटरी क्लबचे असे सेवाभावी काम अविरत सुरू आहे. गरजू रुग्णांसाठी नुकताच २२ वा कॅम्प घेण्यात आला.
शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून हेमांग धरमशी, तिलेश मैशेरी, मुंबई, प्रशांत पटेल, राहुल पटेल परिवार, डॉ.पंकज जिंदाल, डॉ.शंकर सुब्रमण्यम, डॉ.सागर गुंडेवार, डॉ.नोवेल ब्रीटो, डॉ.आनंद दुग्गड, रोटरी क्लबचे अध्यक्ष ब्रिजेश पाटील, सचिव चंद्रेश लोढाया, प्रकल्प प्रमुख मेडिकल डायरेक्टर डॉ.उज्ज्वला देवरे, मनीष जीन, सुनील राजपूत आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करून दीपप्रज्ज्वल करण्यात आले.
शिबिरासाठी पुण्याचे हँड सर्जन डॉ.पंकज जिंदाल, शंकर सुब्रमण्यम, डॉ.सागर गुडिया, डॉ.आनंदगड, डॉ.नवे बिटो हे मुंबई पुणे व गोवा याठिकाणी येऊन गेल्या २१ वर्षापासून सेवा देत आहेत. गेल्या १६ आणि १७ मार्च अशा दोन दिवसांमध्ये साधारणपणे १०२ लहान मोठ्या सर्जरी याठिकाणी परिपूर्ण वैद्यकीय टीमने पूर्ण केल्या. त्यांना चाळीसगाव येथील डॉ.गौरव परदेशी, डॉ.सुनील राजपूत, डॉ.सौरभ देवरे, डॉ.स्वप्नील पाटील, डॉ.सुलभा साळुंखे, डॉ.सोनवणे अशा स्थानिक डॉक्टरांनी दोन दिवस सेवा दिली. गेल्या कित्येक वर्षापासून महावीर हॉस्पिटलचे डॉ.अमित जैन आणि सौ.जैन हे दाम्पत्य तीन दिवस आपली स्वतःची प्रॅक्टिस बंद करून शिबिरासाठी सेवा देतात. तसेच डॉ.स्व.अविनाश येळेकर यांनी मागील २१ वर्ष शिबिराला सातत्याने सेवा देऊन रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले आहे. रोटरी क्लबतर्फे डॉक्टरांच्या स्मृतीप्रित्यर्थ परिवाराला सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी धरमशी परिवाराचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शिबिरात येळेकर परिवाराच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी डॉ.सुनील राजपूत यांनी त्यांच्या कार्याचे सन्मानपत्र वाचून दाखविले. ते त्यांच्या परिवाराला सुपूर्द करून त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच पटेल परिवाराचा परिचय किरण देशमुख यांनी करुन दिला. त्यांनाही त्यांच्या दातृत्वाबद्दल सन्मानित करण्यात आले. शिबिरासाठी सर्व वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स यांनाही शाल व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमानंतर धरमशी परिवार यांच्या हस्ते फीत कापून ऑपरेशन थिएटरला ऑपरेशनची सुरुवात करण्यात आली. शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांसाठी पुन्हा एक महिन्यांनी डॉ.पंकज जिंदाल तपासणीसाठी येणार आहे. यानंतर धरमशी परिवाराचा परिचय मनीषा शाह यांनी करुन दिला. प्रास्ताविक ब्रिजेश पाटील तर आभार सचिव चंद्रेश लोडाया यांनी मानले.