सोनी नगरात जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी:
पर्यावरणाची काळजी घेतल्याने आपले जीवन अधिक सुंदर आणि सुरक्षित होते. त्यासाठी वृक्षांची काळजीही घेतली पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात किमान एक तरी झाड लावावे, असे प्रतिपादन जळगाव सहकारी जनता बँकेचे अध्यक्ष सतीष मदाणे यांनी केले. शहरातील पिंप्राळा भागातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव परिसरात गुरुवारी, ३१ जुलै रोजी आयोजित वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. परिसरात विविध प्रकारची २५ झाडे ट्री गार्डसहित लावण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, श्रीकृष्ण मेंगडे, घनश्याम बागुल, नारायण येवले, विठ्ठल जाधव, मधुकर ठाकरे, भैय्यासाहेब बोरसे, निलेश जोशी, विनोद निकम, सोपान पाटील, विजय भावसार, मिलिंद पाटील, धनंजय सोनार, चंद्रकांत जोशी, गजानन पाटील, संजय बोरनारे, नरेश बागडे, मधुकर पाटील, नितीन झंवर, महेंद्र पाटील, नितीन चौधरी, संदीप कासार, शशिकांत बोरसे, महेश सावदेकर, नचिकेत पेठकर, गजानन खोरखेडे आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सोनी नगरातील नागरिकांनी मानले बँकेचे आभार
झाडांना जनावरांसह इतर नुकसानीपासून वाचवा. झाडांना नियमितपणे पाणी द्यावे, असा मार्गदर्शनपर सल्ला आरती हुजुरबाजार यांनी दिला. जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे २५ वृक्ष ट्री गार्डसहित जागृत स्वयंभू महादेव परिसरासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल नरेश बागडे, मधुकर ठाकरे, नारायण येवले, विनोद निकम, विठ्ठल जाधव, भैय्यासाहेब बोरसे, सोपान पाटील, संदीप कासार यांनी आभार मानले.
