Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»शेती करण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी सर्वगुण असावे
    कृषी

    शेती करण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी सर्वगुण असावे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 22, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    शेती करण्यासाठी प्रत्येकात सर्वगुण असावे. इलेक्ट्रीशयनपासून सर्व काही करावे लागते. भविष्यात मजूरांची टंचाई निर्माण होईल. मात्र, त्यावर शाश्‍वत सोल्यूशन काढले पाहिजे. गुणवत्ता, ॲग्रोनामिक सेवेत जैन इरिगेशनमध्ये शेतकऱ्यांचा विचार केला जातो. ते कुटुंबाप्रमाणेच समजतात, असे मनोगत फाली सुसंवादामध्ये सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

    भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ अधिवेशनची सोमवारी जैन हिल्सला सुरवात झाली. शेतकऱ्यांच्या सुसंवादात, शेतीत प्रत्येक दिवशी समस्या आहे, मात्र सोल्यूशन शोधावे लागेल, एकच चावी आहे ती म्हणजे जैन इरिगेशन. बाजारातील मागणीप्रमाणे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले पाहिजे. शेती करावीच लागेल नाहीतर खाणार काय? शेती हा असा व्यवसाय असून ती करावीच लागेल त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेतली पाहिजे यातुन भविष्यातील नायक घडविले जातील. शेती पोट भरण्यापूरती न करता उत्पादन वाढविणे हे महत्त्वाचे आहे. असा केळी, हळद, मका, कांदा, आले, आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सुसंवाद साधला.

    हवामानातील बदल, मार्केंटिग, नवीन तंत्रज्ञान, केळी उत्पादनाचे नफ्याचे आर्थिक गणिते, जैन तंत्रज्ञान यासह विविध प्रश्‍न विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना विचारले. सुनील नारायण पाटील-देवरे (भारूडखेडा, ता.जामनेर), प्रताप काशिनाथ भुतेकर (तोंडापूर, ता.जामनेर), अंकूश राजेंद्र चौधरी (चांगदेव, ता. मुक्ताईनगर), प्रफुल्ल महाजन (वाघोदा, ता. रावेर), निखील मनोहर ढाके (न्हावी, ता. यावल) या शेतकऱ्यांनी आपले अनुभव सांगत भविष्यातील शेतीविषयी मार्गदर्शन केले. रागिणी सहारे, सुजीत नलवंडे, पार्थ बाभूळकर, सानिका बोडके, निलेश चौधरी, प्रियंका शाहू या फाली विद्यार्थ्यांनी लिड केले. सूत्रसंचालन जुली पटेल, रोहिणी घाडगे यांनी केले.

    पहिल्या टप्प्यातील पहिला दिवस

    फाली उपक्रमात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, व मध्यप्रदेश राज्यातील ४०० विद्यार्थी व ५० फालीचे शिक्षक सहभागी झाले. पहिल्या दिवशी जैन हिल्स येथील परिश्रम, ड्रीप डेमो, अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्ट डेमो प्लॉट, फ्यूचर फार्मिंग, एअर आलू, टिश्‍यू कल्चर येथे भेट दिली. जगप्रसिद्ध अशा गांधी तीर्थच्या म्युझियमला देखील भेट दिली. त्याचप्रमाणे टिश्‍युकल्चर पार्क, फळ प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन तेथील निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अधिकारी, सहकारी तसेच फालीचे हर्ष नौटियाल यांनी परिश्रम घेतले.

    विद्यार्थ्यांची अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांसोबत गट चर्चा

    जैन हिल्स येथे दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांची अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांसोबत गट चर्चा झाली. त्यामध्ये जैन इरिगेशनचे तज्ज्ञ डॉ. के.बी.पाटील, डॉ. अनिल ढाके, अतिन त्यागी, संजय सोनजे, जगदीश पाटील हे तसेच इमरान कांचवाला, निवेश जैन (स्ट्रार ॲग्री), दीपक ललवाणी (महिंद्रा सेंट्रल ऑफ एक्सलन्स), शैलेंद्र सिंग, सहयोग तिवारी (आयटीसी), डॉ.परेश पाटील (अमूल इंडिया), डॉ.विनोद चौधरी (गोदरेज टायसन) त्याच प्रमाणे रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील प्रगतशील शेतकरी अमोल पाटील सहभागी झाले होते.

    फालीचा १० वा वर्धापन दिन

    फाली कार्यक्रमाचा १० वा वर्धापन दिन होता. यानिमित्त फालीच्या संस्थापिका नॅन्सी बॅरी यांच्यासह शिक्षक, अधिकारी आणि शेतकरी यांच्या उपस्थितित केक कापण्यात आला. आजचे पाहुणे म्हणून लाभलेले प्रगतशील शेतकरी अमोल पाटील यांचाही वाढदिवस होता. त्यांच्या जन्म दिनाच्या औचित्याने पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला.

    इनोव्हेशन अन्‌ व्यवसाय योजनांचे आज सादरीकरण
    फाली १० मध्ये सहभागी होणाऱ्या शाळांमधील फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि ॲग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. हे विद्यार्थी जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंड कृषी क्षेत्रातील संशोधनाविषयी सादरीकरण करणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ आंबेडकर नगरात जुन्या वादातून तरूणावर मारहाण

    March 4, 2026

    Jalgaon : जळगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद मुलीचा शोध सुरू

    March 4, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये जुन्या वादातून तुफान हाणामारी दोन जखमी

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.