साईमत, इगतपुरी: प्रतिनिधी
स्मशानभूमीत जायला रस्ता नसल्याने चक्क घरासमोरच अंत्यविधी करण्यात आल्याचे आदिवासी बहुल इगतपुरी तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे.
स्मशानभूमीत जायला रस्ता नसल्याने गावातील घरासमोरच अंत्यविधी करण्याची व्ोळ मृताच्या नातेवाईकांवर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण गावामधील ही घटना आहे. स्मशानभूमीकडे जाणारा नेहमीच्या वहिवाटीचा रस्ता स्थानिक शेतकऱ्याने बंद केल्यामुळे हा प्रसंग ओढावला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. गावातील मयत ध्रुपदाबाई चंदर सारुक्ते या महिलेचे 20ऑगस्ट रोजी निधन झाले. अंत्ययात्रा व अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीवर जाणारा रस्ताच स्थानिक शेतकऱ्याने बंद केल्यामुळे मृताच्या कुटुंबाने आपल्या राहत्या घरासमोर अंत्यविधी केला आहे. या गंभीर प्रकारास संपूर्णपणे ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे मृताच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. तसेच महसूल प्रशासनाने तात्काळ रस्ता मोकळा करण्याची आग्रही मागणी देखील याव्ोळी करण्यात आली आहे.
घोटी बाजारपेठेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उंबरकोन गावातील ध्रुपदाबाई चंदर सारुक्ते या महिलेचा 20 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. परंतु स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता स्थानिक ग्रामपंचायत सदस्य असलेल्या शेतकऱ्याने बंद केल्यामुळे अंत्ययात्रेसाठी रस्ताच नव्हता. त्यामुळे अंत्यविधीचा खोळंबा झाला होता. पाऊस सुरु असताना मृतदेहाची अहव्ोलना काही संपेना शेवटी घरासमोरील मोकळ्या जागेत अंत्यविधी करण्याखेरीज त्या कुटुंबासमोर पर्याय नव्हता अखेर त्यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मृतदेहावर घरासमोरच अंत्यसंस्कार केले. मृताच्या नातेवाईकांनी सरपंच, सदस्य संपूर्ण ग्रामपंचायतीस जबाबदार धरले असून आता तरी हा रस्ता मोकळा करा असा टाहो फोडला आहे. स्मशानभूमीच्या आजूबाजूला शेती असल्याने शेतकऱ्यांने तो रस्ता बंद केला आहे. त्यामुळे हा रस्ता प्रशासनाने मोकळा करावा, अशी मागणी याव्ोळी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.