Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»शासनातर्फे शिंपी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना
    चाळीसगाव

    शासनातर्फे शिंपी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

    saimatBy saimatOctober 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था, शिंपी समाजाच्या मागणीला यश

    साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

    अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था व समस्त शिंपी समाजाची अनेक वर्षापासूनच्या मागणीला यश मिळाले आहे. मंत्रिमंडळच्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने शिंपी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे ठरविले आहे.

    या मागणीसाठी शिंपी समाजातील सर्व पोटजातीतील संघटनांनी सरकारकडे अनेकदा निवेदन व पत्रव्यवहार केले होते. ६ सप्टेंबर २०२४ रोजी सागर बंगला, मुंबई येथे समस्त शिंपी समाजाच्या मेळाव्यात अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था व इतर संघटनांनी महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांजवळ श्री संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली होती.

    मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार, विश्वस्त मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते. मध्यवर्ती संस्थेबरोबरच हे समस्त शिंपी समाजाचे यश असून महामंडळाचा शिंपी समाजातील बेरोजगार व व्यावसायिकांना फायदा होणार आहे.

    यांचे मानले आभार

    अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह समस्त मंत्री, या मागणीसाठी पाठपुरावा करणारे आमदार, खासदार यांचे आभार मानले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Chalisgaon : भोरस फाट्याजवळ पिकअप वाहनाला दुचाकीची धडक

    January 9, 2026

    Chalisgaon:कारवरील नियंत्रण सुटले आणि होत्याचे नव्हते झाले; कन्नड घाटात भीषण अपघात

    January 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.