साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव
मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) मध्ये महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत मंत्रिमंडळाची स्थापना झाली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक आणि करिअर कट्टाचे विभागीय समन्वयक प्रा.डॉ.जे.डी.लेकुरवाळे यांनी मुख्यमंत्री प्रतिक वरयानी यांच्यासह अन्य मंत्र्यांना शपथ दिली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवला जातो. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना स्पर्धा परीक्षा, उद्योजकता या विषयाचे सविस्तर मार्गदर्शन मिळावे, यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या हितासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळ नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये मुख्यमंत्री, नियोजनमंत्री, कायदा व शिस्त पालन मंत्री असे विविध खाते व पदभाराचा शपथविधी सोहळा झाला.
या वेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक व करिअर कट्टाचे विभागीय समन्वयक प्रा .डॉ. जे. डी. लेकुरवाळे व करिअर कट्टाचे महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.डॉ.राजीव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळाची निर्मिती करण्यात आली.
मंत्रीमंडळ पुढीलप्रमाणे मुख्यमंत्री पदी- प्रतिक भारत वरयानी, नियोजन मंत्री – नीलम पाटील, कायदा व शिस्त पालन मंत्री- गुणवंत बोरसे, सामान्य प्रशासन मंत्री- आकांक्षा पाटील, माहिती व प्रसारण मंत्री- विशाल पाटील, उद्योजकता मंत्री- नीलेश कांबळे, रोजगार मंत्री- नेहा मोरे , कौशल्य विकास मंत्री- हर्षल सुरडकर , संसदीय मंत्री- प्रियंका बारी व इतर मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी झाला.
या शपथविधी सोहळ्यासाठी प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.लक्ष्मण वाघ, प्रा.डॉ. राम बुधवंत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सृष्टी विजय देशमुख यांनी केले. टिनल अशोक चौधरी यांनी आभार मानले.