मॉडर्न हायस्कूल मध्ये पर्यावरण पूरक भव्य राखी

0
119

साईमत, नाशिक : प्रतिनिधी
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय अशोक नगर सातपूर, या शाळेत रक्षाबंधन निमित्त पर्यावरण पूरक राखी ’माननीय मुख्याध्यापक डॉ. अनिल माळी व कलाशिक्षक चंदर मिरके यांच्या संकल्पनेतून वापरलेल्या विविध रंगांच्या साड्यानं पासून भव्य राखी तयार करण्यात आली.यासाठी विद्यार्थ्यांनी साड्यांचे संकलन केले.
राखीचा व्यास 32 फूट एकूण लांबी 120 फूट तसेच जवळजवळ 80 साड्यांचा वापर करून भव्य अशी पर्यावरणपूरकराखी तयार करण्यात आली. इयत्ता आठवीतील विद्यार्थी संकेत गोपाळ, रणवीर पाटील, हर्षद बोरसे, प्रणव पाटील, अश्‍विनी वाघ, शिवानी बेडसे, करण निकम, आर्यन सूर्यवंशी, व्ोदांत सांगळे, प्रणव वानखेडे, ज्ञानेश बोरसे, सौरभ कदम, पार्थ अहिरराव व शाळेतील शिक्षक योगेश ओहोळ, संदीप गायकवाड, अशोक बोरसे, भगवान चोरमले, योगिता अहिरे, कविता खांडबहाले, श्‍व्ोता लोंढे, मनीषा डगळे या शिक्षकांनी परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अनिल माळी यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here