रागाच्या भारत मुलाने बापाला धाडले यमसदनी

0
16
रागाच्या भारत मुलाने बापाला धाडले यमसदनी

यावल : प्रतिनिधी

वडिलांनी लग्न करून न दिल्याने,तसेच लग्नाला पैसे लावा असे सांगितल्यावरसुद्धा वडिलांनी मुलाचे लग्न लावून न दिल्याने मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि.14 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता मुलाने त्याच्या आई समोरच वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीने 2- 3 वार करून जागीच ठार केल्याची घटना यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण ग्रामस्थांंमध्ये मोठी खळबळ उडाली असून यावल पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,रविवार दि.15जानेवारी रोजी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत
सौ.सुभाबाई रतन कोळी (वय 60) (व्यवसाय घरकाम) रा.पिळोदा खुर्द ता.यावल.जि. जळगाव यांनी म्हटले आहे की, माझे पती रतन तानसिंग कोळी यांचेसह राहते व घरकाम करते रतन कोळी यांची पहिली पत्नी सुमारे 40 वर्षापुर्वी मयत झाली आहे.त्यानंतर माझे रतन कोळी यांच्याशी लग्न झालेले आहे. रतन कोळी याचे पहिल्या पत्नीपासून 3 मुली असून त्यांची लग्न झाली असून ते त्याचे सासरी नांदत आहेत. पती रतन कोळी यांच्यापासून मला 2 मुले प्रविण (वय 35) व लहान मुलगा देवांनद (वय 28) अशी मुले आहेत. मुलगा प्रविणचे लग्न पत्नी भावना हिचेशी झाले असून तो तिच्यासह जळगाव येथे राहतो.लहान मुलगा देवानंद हा अविवाहीत असून तो मजुरी करतो. मुलगा देवानंद व आम्ही पती व पत्नी असे एकत्र एकाच घरात राहतो.

देवानंद हा नेहमी माझे लग्न लावून द्या असे म्हणत होता.काल रविवार दि.14 जानेवारी रोजी रात्रीचे जेवण वैगरे करुन आम्ही तिघे जण घरात झोपलो. घराचे पुढे ओसरीत पती रतन तानसिंग हे खाटेवर झोपले व मी घरात झोपले व दुसऱ्या खोलीत मुलगा देवानंद झोपला.तेव्हा रात्री 11 वाजेचे सुमारास मी घरात खाटेवर झोपण्यासाठी पडलेली असता मुलगा देवानंद हा माझेसमोर त्याचे हातात कुऱ्हाड घेवून घराबाहेर ओसरीत गेला व त्यांनी माझेसमोर पती रतन तानसिंग कोळी यांचे डोक्यात 2 ते 3 कुऱ्हाडीचे वार केले. त्यामुळे रतन तानसिंग यांचे डोके फुटले व मोठा प्रमाणात रक्तस्त्राव होवून ते जागीच मयत झाले.

मुलगा देवानंद यास थाबविण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत त्याने पती रतन तानसिंग यांचे डोके कुऱ्हाडीने फोडले होते.त्यानंतर मुलगा देवानंद हा बाहेर पळून गेला म्हणून मी मोठमोठ्याने आरडाओरड केली त्यामुळे शेजारी राहणारे संदीप जयसिंग कोळी,रविद्र तानसिंग कोळी व जयसिंग तानसिंग कोळी हे आले व त्यांनी पतीला पाहिले.

त्यांनी मुलगा देवानंदचा पाठलाग केला.मुलगा देवानंदने त्याचे लग्न होत नव्हते, तो त्याचे वडीलांकडे नेहमी माझे लग्न करुन द्या, लग्नाला पैसा लावा असे म्हणत होता परंतु पती रतन तानसिंग कोळी हे टाळाटाळ करीत होते.त्याचा देवानंद यास राग आल्याचे कारणावरुन त्याने त्याचे हातात लोखडी कुऱ्हाड घेवून माझे समोर पति रतन कोळी हे झोपलेले असतांना त्यांचे डोक्यात कुऱ्हाडीचे 2 ते 3 घाव मारुन त्यांचा खून केला आहे.म्हणून माझा मुलगा देवानंद रतन कोळी रा.पिळोदा खुर्द ता. यावल याचे विरुध्द फिर्याद आहे. अशी फिर्याद दिल्याने यावल पोलीस स्टेशनला इंपिको 302 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास यावल पोलीस करीत असून, आरोपी देवानंदला अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here