धनाजी नाना महाविद्यालयात हिंदी सप्ताहाची सांगता, बक्षीस वितरण

0
12

सात स्पर्धेतील ३५ यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

साईमत/फैजपूर/प्रतिनिधी :

येथील धनाजी नाना महाविद्यालयात हिंदी विभागतर्फे ‘हिंदी दिना’ निमित्त आयोजित ‘हिंदी सप्ताह’ चा समारोप समारंभात बक्षीस वितरण करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे हिंदी विभागातर्फे हिंदी सप्ताहानिमित्त सात दिवस निबंध, रांगोळी, मेहंदी, वादविवाद, चित्रकला, काव्यवाचन व सामान्य ज्ञान अशा विविध सात स्पर्धां घेण्यात आल्या होत्या. सर्व स्पर्धात कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ३५ यशस्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिकसाठी निवड केली होती. सर्व यशस्वी विजेत्या विद्यार्थ्यांचा ‘समारोप समारंभात’ पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम घेऊन गौरव करण्यात आला.

अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.हरीश नेमाडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.जगदीश पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ.गोविंद मारतळे, कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत, विभाग अध्यक्ष तथा उपप्राचार्य डॉ.कल्पना पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे, एनएसएस अधिकारी डॉ.सतीश पाटील उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. विविध स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून डॉ.ईश्वर ठाकूर, डॉ.ताराचंद सवसाकडे, डॉ.राजेंद्र राजपूत, डॉ.एस.व्ही.जाधव, डॉ.सीमा बारी यांनी सहकार्य केले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. कल्पना पाटील, सूत्रसंचालन पौर्णिमा कोळी तर आभार जागृती कोळी यांनी मानले.

स्पर्धेतील बक्षीस पात्र यशस्वी विद्यार्थी असे

निबंध स्पर्धेत प्रथम पौर्णिमा कोळी, द्वितीय छाया शिरसाळे, तृतीय रूपा अग्रवाल, उत्तेजनार्थ श्रद्धा नाथ जोगी, कनिष्ठ गटात गायत्री चौधरी, डिम्पल सरोदे, काव्यवाचन स्पर्धेत प्रथम झकोरिया खान, द्वितीय छाया शिरसाळे, तृतीय समीर तडवी, कनिष्ठ गटात भूमिका परदेशी, रांगोळी स्पर्धेत प्रथम रूपा अग्रवाल, द्वितीय नेहा पाटील, तृतीय उज्ज्वला पाटील, उत्तेजनार्थ पिंकी भोगे, कनिष्ठ गटात ओजस्वी बोंडे, मेहंदी स्पर्धेत प्रथम दिशा अग्रवाल, द्वितीय रूपा अग्रवाल, तृतीय देवयानी दोडके, उत्तेजनार्थ ललिता पाटील, कनिष्ठ गटात डिंपल सरोदे प्रथम, मानसी आमोदकर द्वितीय, सामान्य ज्ञान स्पर्धेत आर्यन कोळी प्रथम, स्नेहा शेंणगे द्वितीय, ओम राजपूत द्वितीय, माधुरी भरणे तृतीय, कनिष्ठ गटात संयोगिता राजपूत, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम गुंजन जैन, द्वितीय रूपा अग्रवाल, तृतीय अल्तमास इलियास, कनिष्ठ गट कशीरा गलवाडे, चित्रकला स्पर्धेत प्रथम रूपा अग्रवाल, द्वितीय दिशा अग्रवाल, तृतीया लतुजा भंगाळे, उत्तेजनार्थ चैताली चौधरी अशा बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here