
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी
स्वर्गीय के. आर. पाटील यांच्या निधनामुळे मानव सेवा प्रतिष्ठान, वालझिरी (ता. चाळीसगांव, जि. जळगाव) येथे या संस्थेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते.त्यामुळे संस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी संस्थेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. ही बैठक संस्थेचे उपाध्यक्ष संजय अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली.
सभेत एकमताने संस्थेच्या विविध पदांसाठी निवड करण्यात आली.या बैठकीत अध्यक्ष रविंद्र पुंडलिक पाटील,उपाध्यक्ष संजय विश्वासराव अहिरराव,सचिव नरेश कणककुमार दोशी,खजिनदार महेंद्र सिताराम पाटील,कायदेशीर सल्लागार अॅड संग्रामसिंग सुमेरसिंग शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या निवडणुकीच्या प्रसंगी कांती पटेल, हरीष पल्लन, के. डी. पाटील, आर्किटेक्ट धनंजय यशवंतराव चव्हाण, कुलकर्णी साहेब यांच्या वतीन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत गौरव करण्यात आला.
संस्थेच्या कार्यात सातत्य राहावे यासाठी सर्व सभासदांनी एकजूट दर्शविली असून नव्या टीमने संस्थेच्या कार्याला आणखी गती देण्याचे आश्वासन दिले आहे.