गुलाबराव पाटील फाउंडेशनतर्फे ५०० मुलींना मोफत सायकलचे वाटप
साईमत।पाळधी, ता.धरणगाव।प्रतिनिधी।
शाळा घरापासून लांब असल्याने पायपीट करणाऱ्या ५०० विद्यार्थिनींना गुलाबराव पाटील फाउंडेशनतर्फे पहिल्या टप्प्यात सायकल वाटप करण्यात आले. गरजू आणि होतकरू विद्यार्थिनींना सायकल मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आमच्या मुलींमध्ये स्किल आहे, पुढे जाण्याची क्षमता आहे. म्हणून आम्ही सायकल वाटपाचा कार्यक्रम घेतला. या सायकलीमुळे शिक्षणात मदत तर होईलच त्यासोबत आरोग्य सुदृढ राहण्यासही मदत होईल, असा विश्वास व्यक्त करत एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथील सुगोकी लॉन येथे गुलाबराव पाटील फाउंडेशन, मुंबईचे जय बालाजी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
दिलेली सायकल ही केवळ साधन नसून स्वप्नांना दिलेले बळ आहे. गुलाबभाऊंचे हे कार्य मतांसाठी नसून त्यांच्या मनातील इच्छा प्रत्यक्ष कृतीत आणत असल्याचे मत प्रा. डॉ. प्रीती शिंदे यांनी व्यक्त केले. मुलगी ही देवाने दिलेले धन आहे. अशा धनाचे जतन करण्याचे आवाहन त्यांनी मुली व त्यांच्या पालकांना केले. तसेच संस्कार, स्त्री, बाई व आईचे महत्व त्यांनी सविस्तरपणे विषद केले.
प्रास्ताविकात आयोजक तथा जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी मुलींना मोफत सायकल वाटप बाबतचे महत्त्व विशद करून. मतदार संघात एक हजार ३०० मुलींना सायकल वाटपाचे उदिष्ट पूर्ण करणार असल्याचे सांगितले. यावेळी बालाजी ग्रुपचे जनरल मॅनेजर मनिष कर, उपाध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन प्राचार्य नरेंद्र मांडगे तर आभार शाळेचे चेअरमन विक्रम पाटील यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
मुंबई येथील जय बालाजी ग्रुपचे जनरल मॅनेजर मनिष कर, उपाध्यक्ष लालासाहेब गायकवाड, पालकमंत्री यांचे खाजगी अशोक पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, उपजिल्हा प्रमुख पी.एम पाटील, नरेंद्र सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, जनाआप्पा कोळी, साहेबराव वराडे, देविदास कोळी, संदीप सुरळकर, सचिन पवार, मुकुंदराव नन्नवरे, रवींद्र चव्हाण, राजेंद्र चव्हाण, अरविंद मानकरी, मोतीआप्पा पाटील, दूध संघाचे रमेश पाटील, डॉ. कमलाकर पाटील, दिलीप आगीवाल, भारती चौधरी, सुनिता पाटील, समाधान चिंचोरे, जितू पाटील, वासुदेव कोळी यांच्यासह सरपंच, पदाधिकारी, व पालक – मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
*विविध शैक्षणिक संस्थेकडून अर्ज मागविण्यात आले होते.
*नोंदणीसाठी विविध स्टॉल लावले होते.
*मुलींची संख्या लक्षणीय ठरून मुली विविध गणवेशात उपस्थित होत्या.
*परिसरात संपूर्णपणे शैक्षणिक वातावरण होते.
*पालकमंत्री आणि प्रीती शिंदे यांच्या भाषणाने मुली मंत्रमुग्ध झाल्या होत्या.