डॉ.सुभाष तलरेजा यांची जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली
साईमत /मलकापूर /प्रतिनिधी
सामाजिक कार्यातील अनुभव, सर्वधर्म समभाव राखण्याची वृत्ती, नि:स्वार्थ भावनेने कार्य करण्याची प्रामाणिकता लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे डॉ.सुभाष तलरेजा यांची जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांच्याहस्ते डॉ.तलरेजा यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले असून, त्यांच्यावर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी आणि जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काम करण्याची नैतिक जवाबदारी ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई येथे झालेल्या
कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव यांनी प्रसाद जाधव व अरुण अग्रवाल यांच्या पुढाकाराने डॉ.तलरेजा यांचा पक्षात प्रवेश घडवून आणला.डॉ.तलरेजा यांनी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात नेहमीच जनहितासाठी पुढाकार घेतल्यामुळे ही नियुक्ती पक्षासाठी महत्वाची ठरणार आहे.
