साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव येथील रहिवासी तथा शाह बिरादरीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अमानुल्ला शाह यांनी आपल्या नातवाचे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने उपस्थित पाहुण्यांना सरबत पाजून लावत एक आदर्श निर्माण केला आहे.
शहरातील सालार नगर येथील बिस्मिल्ला मशीद मध्ये हा आदर्श विवाह संपन्न झाला. यावेळी मुस्लिम समाजातर्फे मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी नवरदेव मोहम्मद सालीफ, नवरदेवाचे वडील डॉ. एजाजोद्दीन, नवरी अनम शाह, नवरीचे वडील अँग्लो उर्दू ज्युनिअर कॉलेजचे प्रो. अशपाक उस्मान यांचे अभिनंदन केले.
शाह बिरादरीचे डॉ. अमानउल्लाह शाह यांनी जळगाव जिल्ह्यात मुस्लिम समाजाची अँग्लो उर्दू हायस्कूल ही एकमेव हायस्कूल असताना त्यांनी मुस्लिम विद्यार्थिनींसाठी १९७९ साली अंजुमन खिदमत ए खल्क(एकेके) या शैक्षणिक संस्थेची स्थापना करून विद्यार्थिनींसाठी शाळा सुरू केली. ती शाळा आज पाचवी ते बारावी पर्यंत जळगावच्या मध्यवर्ती भागात सुरू आहे.
बिस्मिल्ला मशीद चे धर्मगुरू मौलाना जुबेर यांनी नवरदेव मोहम्मद सलीफ यांना विचारले की, वधू अनम शाह हिने स्वतःला आपल्या निकाह मध्ये ११७८६/- रुपयात महेर च्या मोबदल्यात दिले आपण कबूल केले, त्यावर नवर देवाने निकाह चे वकील इकबाल शाह उस्मान शाह यांना मेहर ची रोख रक्कम अदा केली. या वेळी निकाह चे साक्षीदार डॉ. अमानउल्लाह शाह व प्राध्यापक इकबाल शाह यांच्या साक्षीने निकाह संपन्न झाला.
समाजातील प्रतिष्ठित व श्रीमंत व्यक्तींनी अशा प्रकारचे लग्न केले तर समाजात एक चांगला संदेश जातो व समाजातील गरीब व्यक्ती सुद्धा अशा लग्नाला प्राधान्य देतो म्हणून सर्वांनी केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे याप्रमाणे कार्य करावे असे आवाहन जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी या वेळी मुस्लिम समाजाला केले. या वेळी ईकरा, अँग्लो, ए. के. के. या संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक वृंद व समाज बांधव उपस्थित होते.