साईमत जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील योग मार्गदर्शन केंद्राच्या सहायक प्राध्यापिका डॉ. लीना चौधरी यांना मुंबई विद्यापीठाने योगशास्त्रात पीएच.डी प्रदान केली आहे.
डॉ. लीना चौधरी यांनी डॉ. तबस्सुम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली “इफेक्ट ऑफ योगिक प्रॅक्टीसेस अॅड नस्य ऑन मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स अमंग अॅडालसन्स गर्ल्स : आयुर्वेद अॅण्ड सायकॉलॉजी अॅप्रोच” या विषयावर प्रबंध सादर केला. मौखिक परीक्षेनंतर त्यांना पीएच.डी प्रदान करण्यात आली. त्याबद्दल कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, योग मार्गदर्शन केंद्रप्रमुख व विद्यापीठ उपअभियंता इंजि. राजेश पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य नंदकुमार बेंडाळे तसेच विभागातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. लीना चौधरी या विद्यापीठात गेल्या चार वर्षापासुन कार्यरत आहेत.