साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
म. शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपशिक्षक डॉ. विलास पुरुषोत्तम नारखेडे यांचे बहिणाबाई ज्ञान विकास संस्था व विद्यालयातर्फे नुकतेच संस्था अध्यक्ष बंडूदादा काळे यांनी भावपूर्ण रूपात सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडूदादा काळे, बाळू दादा लोखंडे, मुख्याध्यापक टी एस चौधरी , प्रतिभा खडके, स्वाती कोल्हे, सीमा चौधरी डॉक्टर प्रतिभा राणे संतोष पाटील राजेश वाणी दिनेश चौधरी विशाल पाटील इ. सत्कार प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बंडू दादा काळे अध्यक्ष यांनी डॉ. विलास नारखेडे यांच्या बद्दल गौरवोद्गार काढताना म्हटले की ,आपण गेली अनेक वर्ष शाळेत मनापासून अध्यापनाचे कार्य उत्तमरीत्या अगदी नेटाने व शिस्तीने करीत आलेले आहात. त्यांचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. आपल्याला मिळालेला पुरस्कार आपल्या अष्टपैलू कार्याची पोचपावतीच आहे .मी आशा करतो की, आपण भविष्यातही तसेच कार्य करीत राहून आपल्याकडील असलेले अमूल्य ज्ञान व सहकार्य आम्हाला व आमच्या येणाऱ्या पुढील पिढीला देऊन त्यांचे भवितव्य उज्वल करण्यासाठी मदत करा असे गौरवोद्गार मुख्याध्यापक टी .एस. चौधरी यांनी उत्कृष्ट कार्याचा गौरव यावेळी केला .गरजूंना मदत करणे, नवोपक्रमशीलता, डिजिटल शिक्षणाचा वापर, संशोधन वृत्तीचे लेखन, नवीन संकल्पना व नवचेतना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून ऊर्जा निर्माण केली असे गौरव द्गार काढले व अभिनंदन केले. डॉ. विलास नारखेडे यांनी यशस्वीतेमध्ये , पुरस्कार मिळण्यात सर्वांचा वाटा आहे असे मनोगत व्यक्त केले.