साईमत, जामनेर : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत २०२२-२३ राज्यस्तरीय कार्यशाळा ‘श्री अन्न निरंतर’ नाशिक येथे मधुरम लॉनमध्ये नुकतीच घेण्यात आली. त्यात जामनेर येथील तालुका कृषी अधिकारी डॉ.अभिमन्यू चोपडे आणि पोकरा योजनेचे समूह सहाय्यक रुपेश बिऱ्हाडे यांनी तालुकास्तरावर सेल्फी पार्इंन्ट, प्रभात फेरी, मिलेट दौड, पाककला स्पर्धा, आंतरराष्ट्रीय योगा दिवस, कार्यशाळा, शिबिर, प्रशिक्षण, प्रदर्शन यांचे उत्कृष्ट नियोजन करुन यशस्वी पार पाडले. याबद्दल दोघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यशाळेत जामनेरचे डॉ.अभिमन्यू चोपडे आणि पोकरा योजनेचे रुपेश बिऱ्हाडे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मोहन वाघ (विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक), संभाजी ठाकूर ( विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक), सुनील वानखेडे (विभागीय नोडल अधिकरी स्मार्ट, नाशिक), कुर्बान तडवी (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे), डॉ. विशाल गुंजाळ, महेंद्र छोरीया, रामसिंग वळवी यांच्या हस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्तरावरून दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे.