Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा – अनिल चौधरी
    कृषी

    नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा – अनिल चौधरी

    SaimatBy SaimatJune 9, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत रावेर प्रतिनिधी

    यावल तालुक्यासह जिल्हाभरात बेमोसमी हवामानामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा अडचणीत आला असून  वादळी – वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे कोणत्याही जाचक – अटी न घालता पंचनामे करावे अशा सूचना प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी स्थानीक प्रशासनाला केल्या आहेत.

    रावेर शहरात अतिशय जुनी व मोठी झाडे थेट घरावर कोसळल्याने घरे तुटून उध्वस्त झाली आहे. यामध्ये सुदैवाने कुठलीही जिवंत हानी झालेली नसली, तरी घर – संसार उघडल्यावर आले आहे. नुकसान ग्रस्त परिवाराला आधार म्हणुन शासनाकडून तात्काळ मदत देण्यात यावी. सर्वाधिक नुकसान केळी उत्पादक क्षेत्र असलेल्या रावेर – यावल तालुक्यातील खिरोदा, रसलपुर, मंगरूळ, पिंपरी, अहिरवाडी येथे बसला असून  केळी पिके भुईसपाट झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयाचा फटका बसला आहे.

    याबाबत शेतकऱ्यांचे नेते प्रहार पक्ष प्रमूख आ. बच्चु कडू यांच्याकडे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती देण्यात आली असल्याचे प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी दिली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून तात्काळ मदत जाहीर न करता थेट अर्थ सहाय्य करावे अशी मागणी करण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप पर्यंत शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. यासोबतच शासनाने दिलेल्या पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आसमानी व सुलतानी संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्रां शिवाय जाचक अटीमध्ये न अडकवता थेट पंचनामे करण्यात यावे अशी मागणी अनिल चौधरी यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Raver : निलंबन टाळण्यासाठी ‘डील’; वनखात्यातील लाचखोरी उघड

    January 21, 2026

    Raver : रावेर नगरपालिकेत उपनगराध्यक्ष निवडणुकीत राडा

    January 12, 2026

    Citrus Fruit Plants : लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी : डॉ. एन. के. कृष्णकुमार

    December 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.