पाचोऱ्यात दिवाळीनिमित बाजारपेठ फुलली

0
15
पाचोऱ्यात दिवाळीनिमित बाजारपेठ फुलली -www.saimatlive.com

साईमत पाचोरा  प्रतिनिधी

शहरातील मुख्य बाजार पेठेसह सर्वच ठिकाणी नागरिकांची दिवाळीनिमित्त खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे बाजारपेठ फुलल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. त्यात मातीचे दिवे, पणत्या, आकाश कंदील, रेडीमेड फराळ, किराणा, कपडे खरेदी, इतर वस्तूंच्या खरेदीसाठी शहरात स्टेशन रोड जामनेर रोड भडगाव रोड या भागात मोठी गर्दी होतांना दिसत आहे. दिवाळीचा प्रारंभ गुरुवारी रमा एकादशी आणि वासूबारसपासून झाला आहे. ही दिवाळी येत्या बुधवारी, 15 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील.

दिवाळीला लहान मुलांपासून तरुणाई आणि वयोवृद्धांमध्ये आनंद असतो. पाचोरा शहरात मानसिंगका पटांगणावर फटाक्यांची दुकाने लागली आहे. तेथे खरेदीसाठी गर्दी होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. फटाके खरेदी करतांना नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. एका बाजूला किराणा बाजारपेठेत फराळाचे साहित्य घेण्यासठी गर्दी आहे तर दुसरीकडे अनेक किराणा व्यावसायिकांनी आपल्या दुकानाबाहेरच आचारी लावून फराळ रेडीमेड तयार करण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे किराणा खरेदी केल्यानंतर अनेक ठिकाणी फराळ तयार करून घेण्याकडे गृहिणींचा कल दिसत आहे.

लक्ष लक्ष दीप उजाळत येणारा हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा सण दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. शहरातील विविध ठिकाणी दुकाने विक्रीच्या साहित्यांनी सजली आहे. आकाश कंदील, पणत्यांनी घरे उजळून दिसणार आहे. दुकानेही रंगबिरंगी आकाश कांदिलांनी उजळून दिसत असल्याने विविध आकाराचे कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here