साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर येथे आज सकाळी दहा वाजता जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी येथील ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात लोकप्रतिनिधी व पशुसंवर्धन मालक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आले होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे स्वागत लोकनियुक्त सरपंच नीताताई पाटील सरपंच शंकर जाधव माजी कृषी सभापती प्रदीप लोढा माजी जि प सदस्य राजधर पांढरे माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे उपसरपंच श्याम सावळे उपसरपंच राजीव जाधव आदी मान्यवरांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पशुसंवर्धनावर आलेल्या लपी आजाराने ग्रस्त असलेल्या पशुसंवर्धन मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होऊन सर्व पशुसंवर्धन मालकांनी लस्सीकरण ताबडतोब करून घ्यावे ग्रामपंचायत मदत करावी असे आव्हान केले. त्यानंतर पहूर कसबे येथील समाधान कचरे यांच्या बैलाला लपी आजाराने बांधीत झालेल्या बैलाची अभिजीत राऊत यांनी पाहणी केली. तसेच येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन डॉ. राठोड यांच्याशी येथील परिस्थिती संदर्भात सविस्तर माहिती घेतली. यावेळी लवकरात लवकर अतिरिक्त पशू वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी सरपंच लोकनियुक्त नीता पाटील, सरपंच शंकर जाधव, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, आरोग्यदुत अरविंद देशमुख, माजी जिल्हा परिषदसदस्य राजधर पांढरे , शिवसेना प्रवक्ता तथापत्रकार गणेश पांढरे, उपसरपंच श्याम सावळे, उपसरपंच राजू जाधव , माजी उपसरपंच रवींद्र मोरे , मुख्याध्यापक आर. बी. पाटील, चेतन रोकडे, बंडू पाटील, भाजपा शहराध्यक्ष संदीप बेढे, भारत पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी राठोड, तलाठी जैन, माजी सरपंच लक्ष्मण गोरे, पंचायत समिती सदस्य योगेश भडांगे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते