साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहुर पेठ येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पहुर पेठ ग्रुप ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच नीता ताई पाटील हे होत्या.
तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य राजदर पांढरे, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, ईश्वर बाबूजी,पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील, माजी कृषी सभापती संजय देशमुख, शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे, ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे, ईश्वर बारी, माजी उपसरपंच इका पैलवान ग्रामपंचायत सदस्य इरफान शेख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रियाज शेख, ग्रामपंचायत सदस्य शाबिन शेख इरफान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्या आघाडी प्रमुख राजू भाई जंटलमेन, सलीम मौलाना शेख, कलीम शेख गाणी ,मिनाज भाई वसीम शेख ,युवा सेना उपतालुकाप्रमुख अमीन शेख फारूक राजमहंमद निसार कुरेशी वसीद शेख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी प्रदीप भाऊ लोढा, राजधर पांढरे, रामेश्वर पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अ मोहसीन अ मुनाफ तर आभार अझरुद्दीन फयाजुदीन यांनी मानले, या कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अफजल खान बुहान खान शाळेतील शिक्षक नजमुनिनसा बी फयाजुदीन जकी अहमद अल्लाउद्दीन साजिद मोहम्मद ताज मोहम्मद अमनिउदीन यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी गावातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.