साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
राज्य सरकारने चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला असताना घोडेगाव येथील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान अद्यापपर्यंत वाटप करण्यात आले नाही येत्या आठ दिवसात प्रशासनाने दुष्काळी अनुदान वाटप न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेत रयत सेना राज्य सरकार व महसूल प्रशानाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा रयत सेनेच्यावतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी, ६ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील इतर गावांना दुष्काळी अनुदान महसूल प्रशासन व शासनाच्यावतीने वाटप केले आहे. मात्र, आजपर्यंत चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव येथील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वाटप केले नाही. अनेकवेळा तहसीलदार व तलाठी यांना शेतकरी भेटूनही शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहे. यावर्षी दुष्काळ असल्यामुळे शेतात पिके आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामासाठी पैश्याची खूप गरज असल्यामुळे शासनाने जाहीर केलेले दुष्काळी अनुदान येत्या आठ दिवसात वाटप न झाल्यास चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेत रयत सेना तीव्र आंदोलन छेडेल. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर रयत शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष किरण पवार, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, बाळू शिंदे, आंबरसिंग राठोड, युवराज राठोड, भाऊलाल आगोणे, बाळू आगोणेे, ज्ञानेश्वर बर्वे, अशोक जाधव, गुलाब जाधव, गणेश पवार, अमोल माने, विठ्ठल आगोणे, तुकाराम आगोणेे, हिरामण चव्हाण, अरुण पवार, नेमीचंद राठोड, उत्तम राठोड, अंबादास राठोड, तायाप्पा जाधव यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.