Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नाशिक»Discussions In Review Meeting : मालेगावला नागरी सुविधांसह विविध प्रलंबित कामांबाबत आढावा बैठकीत चर्चा
    नाशिक

    Discussions In Review Meeting : मालेगावला नागरी सुविधांसह विविध प्रलंबित कामांबाबत आढावा बैठकीत चर्चा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 7, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बैठकीला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची लाभली उपस्थिती

    साईमत/मालेगाव/प्रतिनिधी :

    येथील शासकीय विश्रामगृहात महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मनपाची आढावा बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे होते.बैठकीत मालेगाव शहरासह तालुक्यातील नागरी सुविधांसह विविध प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

    बैठकीत मनपा क्षेत्रात कॅन्सर हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध करणे, आयुष (आयुर्वेद) १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी जागेची उपलब्धता, गट क्र. ८१/अ/२ क्रीडांगण आरक्षण प्रस्ताव अंतिम मंजुरीबाबत, मजिप्राकडील जागा विविध विकासकामांसाठी हस्तांतरण करणे, शहरी भागातील घरकुल योजनांचा आढावा, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निवासी प्रयोजनासाठी नियमनकुल करणे, प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण, नाट्यगृहाचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही व अस्तित्वातील इमारतींचे निर्लेखन, मनपा क्षेत्रातील बंद शाळा इमारतींचा योग्य वापर नियोजन, मार्च अखेर पूर्ण झालेल्या कामांचा आढावा, पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावयाच्या कामांचा आढावा, मनपा क्षेत्रात वृक्ष लागवड व नदी स्वच्छता मोहीम, प्रमुख रस्त्यांवरील पथदिप दुरुस्ती व नविन मंजूर पथदिप कामांची सद्यस्थिती, रस्ते व भूमिगत गटार कामांचा आढावा, मालमत्ता जोडणी व एसटीपी जोडणीबाबत स्थिती, भूमिगत गटारींच्या कामानंतर रस्त्यांची दुरुस्ती, मोसम नदीवरील पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरक्षित तलकांपर्यंत होणे, उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी अतिक्रमण हटविणे, तळवाडे येथील अमृत अभियान टप्पा २ अंतर्गत फिल्टरेशन प्लांटबाबत कार्यवाहीची सद्यस्थिती, मानधन कर्मचाऱ्यांच्या मागण्या, हद्दवाढ कर्मचारी कायमस्वरूपी होईपर्यंत किमान वेतन लागू करणे आदींचा चर्चेत समावेश होता.

    संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आवश्यक सूचना

    बैठकीत सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा होऊन संबंधित अधिकाऱ्यांना ना.भुसे यांनी आवश्यक दिशा आणि सूचना दिल्या. बैठकीमुळे मालेगाव शहरासह परिसरातील नागरी व्यवस्थापन अधिक गतिमान व परिणामकारक होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Death Of The Bride : विवाह मुहूर्तालाच जीवनाची अखेर ; नववधूचा धक्कादायक मृत्यू

    December 29, 2025

    Nashik Municipal Corporation : नाशिक मनपात परिवर्तन घडविणार : आदित्य ठाकरेंचा निर्धार

    December 27, 2025

    Sai Devotees In Shirdi : शिर्डीत साई भक्तांचा महापूर ; नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासन सज्ज

    December 27, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.