लोहाऱ्यात दिव्यांग बांधवांनी घेतली मतदानासाठी शपथ

0
24

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथे एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात उपस्थित दिव्यांगांना मतदान करण्यासाठी शपथ देण्यात आली. यामुळे जळगाव जिल्हा प्रशासनाला एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेनेही मतदान जनजागृतीसाठी हातभार लावला आहे. याबद्दल त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आम्हीही स्वतः लोकशाहीचा घटक आहोत. मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. मतदान हा तुमचा अधिकारच नाही तर तुमची जबाबदारी आहे, असे संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले. यावेळी सचिव विजय जाधव यांनी उपस्थित सर्वांना मतदान करण्यासाठी शपथ दिली.

यावेळी एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव विजय जाधव, खजिनदार कांतीलाल राजपूत, सदस्य विकास शिवदे, बाळू जाधव, अनिल चौधरी, विठ्ठल धनगर, अनिल राजपूत तसेच म्हसास, रामेश्‍वर तांडा, कासमपुरा, कळमसरा, मोरगाव तांडा, परिसरातील दिव्यांग बांधव, भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here