Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»ग्रामसेवकास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नवापुरात राज्य युनियनतर्फे धरणे आंदोलन
    क्राईम

    ग्रामसेवकास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नवापुरात राज्य युनियनतर्फे धरणे आंदोलन

    SaimatBy SaimatSeptember 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, नवापूर, प्रतिनिधी

    ब्राह्मणगाव तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील ग्रामसभेत ग्रामसेवकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन नवापूर तालुका शाखेतर्फे नवापूर पंचायत समिती आवारा धरणे आंदोलन करण्यात आले. ब्राह्मणगाव येथे कर्तव्यावर कार्यरत असलेल्या ग्रामसेवकास ग्रामसभेत झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ एक दिवशीय धरणे आंदोलन करुन घटनेचा निषेध करण्यात आला. तसे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायत ब्राह्मणगांव ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे कर्तव्यावर असलेले ग्रामसेवक बांधवास घरकुल विषयावरुन ग्रामसभेत मारहाण झालेली आहे. याआधीच काही दिवसांपूर्वी घरकुल विषयावरुन ग्रामपंचायत रामपूर ता.अक्कलकुवा येथे देखील एका ग्रामसेवक बांधवावर खोटे अन्यायकारक गुन्हे दाखल झालेले आहेत.

    ग्रामसेवक बांधवावर नेहमीच अन्याय होत असून ते कर्तव्यावर असतांना त्यांना ग्रामसभा सुरु असतांना मारठोक करणे व शासकीय कामात अडथळा निर्माण करणे हे सततचे होत चालले आहे. यामुळे  ग्रामसेवक बांधवांना त्यांच्या पदावर कार्य करणे अतिशय जिकरीचे झालेले असून यामुळे त्यांच्या जिवितास देखील धोका निर्माण झालेला असल्याचे निदर्शनास येत आहे असे निवेदनात म्हटले आहे. युनियनचे अध्यक्ष नरेंद्र पाडवी,सचिव सुनील वळवी,उपाध्यक्ष नरेंद्र धनगर नितीन पाटील. दिलीप खोब्रागडे,बिना सरदार,कैलास सोनवने,दौलेश गावित,देवरे व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेविका उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याने संपविले जीवन

    March 9, 2026

    Amalner : भरधाव दुचाकीची भीषण धडक विटनेर येथील ४८ वर्षीय प्रौढाचा मृत्यू

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.