३२६ प्रकरणांपैकी ४३ प्रकरणे काढले निकाली
साईमत/धरणगाव/ प्रतिनिधी :
येथील तालुका विधी समिती व तालुका वकील संघाच्यावतीने न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. यावेळी कोर्टाचे ३२६ प्रकरणांपैकी ४३ प्रकरणे निकाली काढण्यात आले. तसेच बँका, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, नगरपालिका, बी. एस. एन. एल. यांच्याकडील ९९४ प्रकरणांपैकी ४५ प्रकरणे निकाली काढण्यात आले. अदालतीत ३३ लाख २० हजार ६४२ रूपयांची वसूली करण्यात आली.
पॅनल प्रमुख म्हणून धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश अविनाश ढोके तसेच पंच म्हणून ॲड. अक्षय दवे यांनी काम पाहिले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर.एस.शिंदे, उपाध्यक्ष ॲड. व्ही.एस.भोलाणे, सचिव ॲड. मनोज दवे, ॲड.राहुल पारेख, ॲड.शरद माळी, ॲड.डी.ए.माळी, ॲड. संदीप सुतारे, ॲड. प्रशांत क्षत्रिय, ॲड.एकनाथ पाटील, ॲड.प्रदीप पाटील, ॲड.रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी धरणगाव न्यायालयातील सहा.अधीक्षक. डी. एम. कुलकर्णी, एस. पी. चौधरी वरिष्ठ लिपिक, व्ही. पी. सपकाळे, संतोष भालेराव, गुलाब लांबोळे, श्याम पाटील, ईश्वर चौधरी, राहुल पाटील, कनिष्ठ लिपिक तसेच राहुल बोरसे शिपाई यांनी परिश्रम घेतले.