धरणगाव न.प.चा कारभार वाऱ्यावर अन्‌ अधिकारी दौऱ्यावर : गुलाबराव देवकर

0
75

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षातर्फे नगरपरिषदेला निवेदन सादर

साईमत/न्यूज नेटवर्क/धरणगाव :

येथील नगरपरिषदेचा कारभार वाऱ्यावर आणि अधिकारी दौऱ्यावर असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. त्यामुळे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पायाभूत सुविधांच्या संदर्भात निवेदन देऊन जाब विचारण्यात आला. नागरिकांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभे करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

धरणगाव नगरपरिषदेमार्फत १० ते १२ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा गढूळ आणि दूषित स्वरूपाचा आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील पाईपलाईनच्या कामांमुळे वारंवार खोदकाम केल्याने ठिकठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. बंद पडलेले पथदिवे, तुडुंब भरलेल्या गटारी अशा अनेक समस्यांच्या संदर्भात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी यांना निवेदन सादर करण्यात आले. नगरपरिषदेच्या गलथान कारभाराबाबत बोलतांना श्री.देवकर यांनी प्रशासनाला कडक शब्दात जाब विचारला. नगरपरिषदेचा कारभार वाऱ्यावर, अधिकारी दौऱ्यावर आणि गावातील नागरिक परिस्थितीने त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, ज्येष्ठ नेते मोहन पाटील, तालुका कार्याध्यक्ष अरविंद देवरे, काँग्रेस युवक शहराध्यक्ष भूषण भागवत, अमोल हरपे, नारायण चौधरी, रमेश महाजन, अशोक जाधव, गोविंद पाटील, चेतन पाटील, सागर महाले, वैभव बोरसे, अतुल वाघ, निखिल पाटील, विनित पाटील, सागर चव्हाण, प्रफुल्ल पवार, दिनेश भदाणे, रामकृष्ण मराठे, अशोक पाटील, दुर्गेश चौधरी, नितीन पाटील, गौरव पाटील, जयेश पाटील, चंपालाल भदाणे, रमजान शाह, सचिन पाटील, किशोर भदाणे, निखिल भदाणे, विनायक पाटील यांच्यासह गावातील नागरिक, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here