साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
रूढी परंपरांना व अनिष्ट प्रथांना बाजू देत धरणगाव येथील नवेगाव गणेश मित्र मंडळाने परिसरात येणाऱ्या तृतीयपंथीयांच्या हस्ते गणेशाची आरती करून एक अनोखा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. याप्रसंगी गोपी गुरु, कविता गुरु यांच्या इतर सहकाऱ्यांसमवेत महाआरतीचा मान देत मंडळाने एक अनोखा उपक्रम राबविला.
याप्रसंगी नवेगाव गणेश मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, परिसरातील सर्व भाविक भक्त, सर्व समाज बांधव, सामाजिक व राजकीय पदाधिकारी आदी उपस्थित होते.