Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Dharangaon : पैशांच्या वादातून दाम्पत्यावर हल्ला; महिलेला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा
    क्राईम

    Dharangaon : पैशांच्या वादातून दाम्पत्यावर हल्ला; महिलेला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा

    saimatBy saimatMarch 16, 2026Updated:March 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत/ धरणगाव / प्रतिनिधी 

    पैशांच्या व्यवहाराच्या वादातून ५५ वर्षीय महिलेसह त्यांच्या पतीला अमानुष मारहाण केल्याची घटना धरणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. मुलाने घेतलेल्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून संतप्त झालेल्या एका व्यक्तीने कुऱ्हाडीच्या उलट्या दांड्याने महिलेच्या डोक्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, वत्सलाबाई रघुनाथ ठाकरे (वय ५५, रा. धार, ता. धरणगाव) या १४ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोरील सार्वजनिक जागेत उभ्या होत्या. यावेळी आरोपी कैलास सुपडू ठाकरे याने त्यांच्या मुलाने घेतलेल्या पैशांची मागणी केली. मात्र “त्या पैशांच्या व्यवहाराची मला माहिती नाही,” असे वत्सलाबाई यांनी सांगताच आरोपी संतापला.

    रागाच्या भरात कैलास ठाकरे याने जवळ असलेल्या कुऱ्हाडीच्या उलट्या दांड्याने वत्सलाबाई यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या त्यांच्या पतीनाही आरोपीने शिवीगाळ करत पाठीवर, पोटावर आणि तोंडावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डाव्या डोळ्यालाही दुखापत झाली आहे.

    या घटनेप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आरोपी कैलास ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ अर्जून कुवारे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pune Crime : पुणे वाघोलीत चहा पिताना तरुणावर जीवघेणा कोयता हल्ला; आरोपी अटक

    March 16, 2026

    Jalgaon : जळगाव पोलिसांच्या गोपनीय माहितीतून मालेगाव टोळीचा पर्दाफाश

    March 16, 2026

    Asoda : आसोदा गावात किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.