साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी (प्रविण चौरे)
गुटका विक्रीस शासनाने बंदी घातलेली असताना ही ओझरला मात्र पोलिसांच्या आशिर्वादाने गुटका विक्री जोरात सुरू असुन अव्वाच्या सव्वा दराने घुटका विक्री करणारे जोमात आहे.
गुटख्यावर शासनाने बंदी घातलेली आहे तसेच नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैद्य धंदे बंद केलेले असताना ओझर गांवात मात्र गुटका, मावा यासारखे नशा येणारे पदार्थ सर्रास मिळत असुन पानटपरी, छोटे चहाचे स्टॉल्स व जनरल स्टोअर्स यांच्यासोबत आता किराणा दुकानातही गुटखा उपलब्ध होत असल्यामुळे ओझरमध्ये बंदी कागदावरच असुन गुटकाविक्री बेकायदेशीर रित्या जोमात सुरू आहे.
शासनाचे ओझर मधील पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि नगरपरिषद प्रशासन यांचे या बाबीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे गुटकाविक्री जोरात सुरू आहे. ओझर गांवातील पोलीस चौकी जवळील पान टपऱ्या तसेच पोलीस चौकीच्या मागील बाजूला असलेली बाजारपेठ या ठिकाणी असलेले होलसेल दुकाने यामध्ये सर्रासपणे गुटका विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.हा गुटका मध्य प्रदेश मधून येत असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील ठराविक व्यक्तीच्या माध्यमातुन नियमीतपणे व राजरोसपणे गुटक्याची वाहतूक करीत आहेत. पोलिस त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याची नागरिकामध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. गुटखा शहरात आल्यानंतर ठराविक दुकानदारांकडे पाठविला जातो. तेथून संबंधित रिटेलर खरेदीदार घेऊन जातो. गुटख्याच्या एका पुडीची किंमत 10 ते 20 रुपये आहे.
गुटख्यास बंदी असल्यामुळे कोणीही दराचा विचार करीत नाही. मिळेल त्या किमतीने गुटखा खरेदी केला जात आहे. ग्रामीण भागातील खरेदीदारांना ओझर गांवातील किराणा मालाच्या दुकानातून गुटका पुरविला जातो. शहरातील अनधिकृत टपऱ्या, छोटे स्टॉल्स आणि पत्र्याचे तात्पुरते उभारलेले शेड यांमधूनही गुटकाविक्री केली जाते. एक पानटपरीधारक महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल करत असल्याची ही चर्चा आहे. गांवातील अनधिकृत टपरी व बांधकामांवर नगरपरिषदेकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे अवैध धंदेही सुरू होण्यास प्रोत्साहन मिळत आहे.