राहुल गांधींबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ चाेपड्यात काँग्रेसतर्फे निदर्शने

0
32

आ. संजय गायकवाड, खा.अनिल बोंडे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

साईमत। चोपडा।प्रतिनिधी।

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्याबाबत बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड आणि खा.अनिल बोंडे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई होवून गुन्हा दाखल व्हावा, त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी येथील चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुरुवारी, १९ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ॲड.संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक देवरे यांना निवेदनही देण्यात आले.

आंदोलनावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक नंदकिशोर सांगोरे, माजी शहराध्यक्ष के.डी.चौधरी, शेख आरिफ शेख सिद्दिकी, फातिमाबी पठाण, ग.स.चे माजी संचालक रमेश शिंदे, चोपडा साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन गोपाल धनगर, सूतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील, देविदास सोनवणे, सुनील बागुले, वजाहत काझी, चोसाकाचे संचालक शरद धनगर, शेतकी संघांचे संचालक बाळकृष्ण पाटील, मीर आबिद अली, संजय बोरसे, गुलाब बारेला, लक्ष्मण कावीरे, देवकांत चौधरी, इलियाज पटेल, सतीश पाटील, अनिल युवराज पाटील, एन.एस.यु.आय.चे प्रदेश सचिव चेतन बाविस्कर, युवराज पाटील, यशवंत खैरनार, शिरीष पाटील, देविदास साळुंखे, प्रताप सोनवणे, मोहन पाटील, प्रा.विलास दारुंटे, गफ्फार अली यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here