साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील जिल्हा परिषदेच्या मराठी मुलींच्या शाळेत दोन वर्षांसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड घोषित करण्यात आली. त्यात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार दीपक वामनराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पहिली चवथीच्या पालकांमधून ९ सदस्यांची निवड शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी दीपक वामन पवार, उपाध्यक्षपदी प्रल्हाद नामदेव चौधरी तर सदस्यांमध्ये प्रकाश शंकर सोनवणे, गजानन सरोदे, विद्या अनिल मेहरे, मंगला भरत लोहार, सोनी जगदीश तेली, लता पुंडलिक भिवसने, जयश्री कृष्णा कोळी यांचा समावेश आहे. तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून संध्या पाटील, सचिव तथा मुख्याध्यापक विजयसिंग राजपूत, शिक्षणतज्ज्ञ म्हणून दत्तात्रय भोसांडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक पवार यांचा मुख्याध्यापक विजयसिंह राजपूत यांनी तर उपाध्यक्ष प्रल्हाद चौधरी यांचा कृष्णा तपोने यांनी सत्कार केला. यासोबतच सर्व सदस्यांचा सत्कार शिक्षकांनी केला.
शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध
जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. शाळेत विविध उपक्रम व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अनेकांकडून कौतुक होत आहे.