Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»गंगापुरीला कानुमातेच्या उत्सवासाठी आलेल्या विवाहितेचा मृत्यू
    धरणगाव

    गंगापुरीला कानुमातेच्या उत्सवासाठी आलेल्या विवाहितेचा मृत्यू

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
    तालुक्यातील गंगापुरी येथील विवाहितेचा विद्युत वजन काट्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी, २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. यामुळे कानुमातेच्या उत्सवासाठी घरी आलेल्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारती घनश्याम पाटील (वय ३०, रा. गंगापुरी, ता. धरणगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

    सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील गंगापुरी येथील घनश्याम रायभान पाटील हे पत्नी भारती पाटील आणि दोन मुलांसह सुरत येथे वास्तव्याला आहे. कानुबाईचा उत्सव असल्याने घनश्याम पाटील हे पत्नी व दोन्ही मुलांसह गंगापुरी येथे आलेले होते. रविवारी, २७ ऑगस्ट रोजी घनशाम पाटील हे आईवडिलांसह सकाळी शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी विवाहिता भारती आणि दोन्ही मुले घरीच होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भारतीबाईची दोन्ही मुले रडत आरडाओरड करायला सुरूवात केली. शेजारी राहणाऱ्यांना आमची आई बेशुध्द पडली असल्याचे सांगितले. शेजारी राहणाऱ्या महिला व ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यांच्या हातात वजन काट्याची इलेक्ट्रीक पीन हातात दिसली. त्यामुळे त्यांचा इलेक्ट्रीक शॉकचा धक्का लागल्याने त्या बेशुध्दावस्थेत आढळून आल्या. ग्रामस्थांनी मिळून भारती पाटील यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन तिला मयत घोषित केले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पो.हे.कॉ. ईश्वर शिंदे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Dharangaon : शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

    January 31, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रकरण : दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

    January 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.